
कंत्राटदारांच्या ‘उत्कृष्ट’ कामगिरीवर महापालिकेची मेहरबानी: रस्ते उद्ध्वस्त करणाऱ्यांना २५५ कोटींची ‘बक्षिशी’!
सांडपाणी वाहिनीच्या खोदकामानंतर रस्त्यांची अक्षरशः चाळण; करदात्यांच्या पैशातून ३८ कि.मी. रस्त्यांची होणार पुनर्बांधणी नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या (PHE) भोंगळ कारभाराचा आणि कंत्राटदारांच्या मनमानीचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. दक्षिण-पश्चिम नागपूरमधील ‘साउथ सिवरेज झोन’ प्रकल्पांतर्गत सांडपाणी…












