Rajkaran

चंद्रपुरात 'डीजे'वर बंदी; गणेशोत्सवात पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

चंद्रपुरात ‘डीजे’वर बंदी; गणेशोत्सवात पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर: आगामी सार्वजनिक गणेशोत्सव-२०२६ च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या ध्वनी प्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी यंदा श्री गणेश चतुर्थीपासून जिल्ह्यात ‘डीजे’ (DJ) वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.…

नागपूर RTO मध्ये १५०० चोरीच्या गाड्यांची नोंदणी; विधानसभेत वडेट्टीवारांचा घणाघात, IPS प्रियांका ननावरे यांच्या नेतृत्वात SIT चौकशीचे आदेश

नागपूर RTO मध्ये १५०० चोरीच्या गाड्यांची नोंदणी; विधानसभेत वडेट्टीवारांचा घणाघात, IPS प्रियांका ननावरे यांच्या नेतृत्वात SIT चौकशीचे आदेश

मुंबई: राज्याच्या पावसाळी अधिवेशनात प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) भ्रष्टाचाराचा आणि बेकायदेशीर वसुलीचा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर आणि विदर्भ RTO मध्ये सुरू असलेल्या संघटित वसुली रॅकेटचा विधानसभेत पुराव्यांसह पर्दाफाश केला. या गंभीर आरोपांची तातडीने दखल घेत,…

"चंद्रपूरचा कारभार रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री बघतात, फिजिक्सच्या पुस्तकात केमिस्ट्री वाचू नका" - सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्ट भूमिका

“चंद्रपूरचा कारभार रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री बघतात, फिजिक्सच्या पुस्तकात केमिस्ट्री वाचू नका” – सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्ट भूमिका

चंद्रपूर: महाराष्ट्र प्रदेश भाजपने नुकतीच चंद्रपूर ग्रामीण जिल्हा भाजपची नवनियुक्त कार्यकारिणी स्थगित (बरखास्त) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कार्यकारिणीमध्ये माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थकांचा मोठा भरणा होता. प्रदेश नेतृत्वाच्या या निर्णयानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत…

चंद्रपूर मनपात रंगला 'भाजप विरुद्ध भाजप'चा महासंग्राम! मुनगंटीवार आणि जोरगेवार समर्थकांमध्ये तुफान राडा

चंद्रपूर मनपात रंगला ‘भाजप विरुद्ध भाजप’चा महासंग्राम! मुनगंटीवार आणि जोरगेवार समर्थकांमध्ये तुफान राडा

चंद्रपूर महानगरपालिकेच्या कार्यालयात सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील गटबाजीचे उग्र आणि धक्कादायक रूप शुक्रवारी पाहायला मिळाले. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थकांमध्ये महापालिकेच्या आवारातच जोरदार राडा झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतर काही…

चंद्रपूर मनपात बोगस कंत्राटावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष;

चंद्रपूर मनपात बोगस कंत्राटावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष;

स्थायी समितीने फेटाळलेला ठराव महापौरांकडून आमसभेत मंजूर, ३ जुलैच्या सभेपूर्वी राजकीय वातावरण तापले चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील अंतर्गत राजकारण आणि कंत्राट वाटपातील कथित गैरव्यवहार आता चव्हाट्यावर आला आहे. एका बाजूला मनपाची स्थायी समिती ज्या कंत्राटदार संस्थेला ‘बोगस’ ठरवून तिचे कंत्राट रद्द…

धानोरकरांचा खासदार निधी 19 कोटी 90 लाख रुपये धूळ खात निधी खर्चाचे प्रमाण फक्त 5.3 टक्के

धानोरकरांचा खासदार निधी 19 कोटी 90 लाख रुपये धूळ खात निधी खर्चाचे प्रमाण फक्त 5.3 टक्के

चंद्रपूर: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यप्रणालीबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणुकीत विकासाची मोठी आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींचे खरे वास्तव आता आकडेवारीतून उघड झाले असून, चंद्रपूरकरांच्या पदरी मोठी निराशा पडली आहे. खासदार स्थानिक…

महसूलमंत्र्यांच्याच नाकाखाली महाघोटाळा! ४१ कोटींच्या जमिनीचा व्यवहार अवघ्या ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर; प्रशासनाला अंधारात ठेवून सरकारची कोट्यवधींची लूट!

महसूलमंत्र्यांच्याच नाकाखाली महाघोटाळा! ४१ कोटींच्या जमिनीचा व्यवहार अवघ्या ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर; प्रशासनाला अंधारात ठेवून सरकारची कोट्यवधींची लूट!

नागपूर: राज्याच्या महसूल विभागात ‘पारदर्शकतेचे’ दावे केले जात असताना, खुद्द राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच नागपूर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक ‘स्टॅम्प ड्युटी घोटाळा’ उघडकीस आला आहे. मौजा बेसा येथील तब्बल ४१ कोटी रुपयांच्या मोक्याच्या जमिनीचा व्यवहार चक्क ५००…

चंद्रपूर मनपात खळबळ: दोन्ही उपायुक्तांची बदलीसाठी धाव, तर मुख्य लेखाधिकारी रजेवर; आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

चंद्रपूर मनपात खळबळ: दोन्ही उपायुक्तांची बदलीसाठी धाव, तर मुख्य लेखाधिकारी रजेवर; आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे पालिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे. आयुक्तांच्या कार्यशैलीला कंटाळून महापालिकेतील दोन उपायुक्तांनी आपली बदली करण्याची मागणी केली आहे, तर मुख्य लेखाधिकारी आठवडाभराच्या रजेवर गेल्याने पालिकेचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. आयुक्तांचा…

"मला हलक्यात घेऊ नका, मी आधी शिवसैनिक आहे!" - आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे सभापती मनस्वी गिहे संतापल्या; स्थायी समितीच्या सभेतून काढला पाय

“मला हलक्यात घेऊ नका, मी आधी शिवसैनिक आहे!” – आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे सभापती मनस्वी गिहे संतापल्या; स्थायी समितीच्या सभेतून काढला पाय

चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत सोमवारी (११ मे) मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. आयुक्त अकुनुरी नरेश आणि उपायुक्त शेषराव टाले यांच्यासह इतर महत्त्वाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने संतापलेल्या सभापती मनस्वी गिहे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आणि आक्रमक पवित्रा घेत…

चंद्रपूर मनपाचा भोंगळ कारभार: ५ लाखांच्या शहरात एकही स्वच्छता निरीक्षक नाही, स्वच्छता विभागात १८८ पदे रिक्त!

चंद्रपूर मनपाचा भोंगळ कारभार: ५ लाखांच्या शहरात एकही स्वच्छता निरीक्षक नाही, स्वच्छता विभागात १८८ पदे रिक्त!

चंद्रपूर महानगरपालिकेच्या निर्मितीला १४ वर्षे पूर्ण झाली असून, शहराची हद्द आणि लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आजघडीला शहराची लोकसंख्या जवळपास ५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा स्वच्छता विभाग स्वतःच ‘आजारी’ असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. उपलब्ध…