महायुती सरकार देशात सर्वाधिक भ्रष्ट

काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांचा घणाघात

चंद्रपूर : महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार देशात सर्वात भ्रष्ट्र आहे. या सरकारला जनाधार उरला नाही. राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. त्यानंतर दिल्लीत केंद्रात सत्ता बदलाची प्रक्रीया सुरु होईल, असा दावा कॅांग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी केला. 

गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि आढावा बैठक आज चंद्रपुरात पार पडली. या मेळाव्याला चेन्नीथाला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कॅांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार नामदेव किरसान, खासदार प्रशांत पडोळे, कॅांग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे , रामकिशन ओझा, शहर अध्यक्ष रामू तिवारी, नाना गावंडे आदी उपस्थित होते. राज्यातील सर्वच मतदार संघातील कॅांग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा झाली आहे. मतदार महायुतीचे सरकार घालविण्यासाठी तयार आहे. राज्यात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात आहे. बेरोजगारीचा दर वाढला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. लवकरच  यावर शिक्कामोर्तब होईल. आमच्या कोणतेही मतभेद नाही, असे चेन्नीथाला यांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष पटोले यांनीही महायुती सरकारवर यावेळी टिकास्त्र सोडले. यांच्या विकासाचे मॅाडेल भ्रष्टाचारा आहे. राज्याचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या पुतळ्याच्या कामात सुद्धा या लोकांना भ्रष्टाचार केला. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन होईल, याबाबत शंका आहे. राज्य आर्थिक दिवाळखोरीत निघाले आहे. मात्र आम्ही सत्तेत आल्यास लाकडी बहिण योजना बंद करणार नाही. त्यात आणखी वाढू करु, असे पटोले यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी भाजपला दुतोंडी सापाची उपमा दिला. महाराष्ट्राची अस्मिती गुजरातला गहाण ठेवली आहे. आतापर्यंत या सरकारच्या कार्यकाळात तीन लाख २८ हजार कोटींची तब्बल २९ प्रकल्प गुजराला पळविले आहे. 

पाच लाख कोटींच्या जमिनी गुजराती उद्योंगपतीना दिला. तीस टक्के वसुलीसाठी निर्धारीत तुरतुदीच्या अधिकचे प्रकल्प सुरु आहे. पीक विम्यात कृषीमंत्र्यांनी कमिशन खाल्ले, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. लाकडी बहिण योजनेचे श्रेय घेण्यावरून एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यात रस्सीखेच सुरू आहे. प्रत्यक्ष निवडणुक लागेपर्यंत महायुतीच टिकणार नाही, असे भाकीत वडेट्टीवार यांनी यावेळी केले.