शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांना संधी – कोण कुठून लढणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चौथी यादी प्रसिद्ध; विधानसभेच्या मैदानात मोठ्या उलथापालथी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चौथी यादी आज (२८ ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली आहे. या नव्या यादीमध्ये सात उमेदवारांची नावे समाविष्ट असून, काटोल मतदारसंघातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी २४ ऑक्टोबरला पहिली यादी (४५ उमेदवार), २६ ऑक्टोबरला दुसरी यादी (२२ उमेदवार), आणि २७ ऑक्टोबरला तिसरी यादी (९ उमेदवार) जाहीर झाली होती. आता एकूण ८३ उमेदवारांची नावे राष्ट्रवादी काँग्रेसकडून घोषित झालेली आहेत.

https://twitter.com/NCPspeaks/status/1850853429465227370

अनिल देशमुख यांनी घेतली निवडणुकीतून माघार; मुलगा सलील देशमुख काटोलमधून उमेदवार

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काटोल विधानसभा मतदारसंघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ऐवजी त्यांचे चिरंजीव सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनिल देशमुख यांनी यंदा निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांच्या जागी आता त्यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. अनिल देशमुख यांनी माघार घेतल्यामुळे या निर्णयावर मतदारांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

७ नव्या उमेदवारांची यादी: जाणून घ्या, कोणाला कुठून संधी मिळाली?

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर झालेल्या चौथ्या यादीतील उमेदवारांची नावे आणि त्यांच्या मतदारसंघांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

क्र.मतदारसंघ क्र.मतदारसंघाचे नावउमेदवाराचे नाव
२५८माणप्रभाकर घार्गे
४८काटोलसलील अनिल देशमुख
२८६खानापूरवैभव पाटील
२५६वाईअरुणादेवी पिसाळ
१९९दौंडरमेश थोरात
८१पुसदशरद मेंद
सिंदखेडासंदीप बेडसे

अंतिम टप्प्यात उमेदवार घोषणांमध्ये वेग; उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत उद्या, २९ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे विविध पक्षांनी उर्वरित उमेदवारांच्या घोषणा करत आपली रणनीती स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये या उमेदवार याद्यांवरून मतविभागणीची चर्चाही सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू केली आहे.