लोकशाहीमध्ये कायद्यासमोर सर्व समान आहे, पण काही लोकं जास्त समान आहेत.
देशात सामान्य नागरिकांना वरील वाक्याचा अनुभव नेहमीच येत असतो. पण सामान्य नागरिक बिचारे मूग गिळून बसतात. कारण एक तर त्यांना आपल्या हक्काची माहिती नसते आणि पोलिसांसमोर काही बोललं तर पोलीस लोक आपला “पोलिसी ख्याका” दाखवून त्यांना शांत करतात. नागपूरच्या गायत्री नगरमध्ये आय. टी पार्क येथे असाच अनुभव काही नागरिकांना आला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या विडिओमध्ये एक नागरिक रस्त्याच्या दोन्ही कडेने वाहने पार्क असताना फक्त एकाच बाजूच्या वाहनावर कारवाई करणाऱ्या पोलिसांविरुद्ध आवाज उठवताना दिसत आहे. या नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे वि एन आय टी कडून रिंग रोड कडे जाणाऱ्या रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या वाहनावर वाहतूक पोलीस कारवाई करतात. पण विरुद्ध दिशेला खूप वाहने पदपथावर ठेवली असतानासुद्धा वाहतूक पोलिसांची गाडी कारवाई करीत नाही. तसेच नागरिकाने जेव्हा या संबंधात कारवाई करण्यास सांगितले असता वाहतूक पोलीस तेथील इमारतींच्या कर्मचाऱ्यांना संबंधित नागरिकांमुळेच तुमच्या वाहनावर कारवाई करतोय असे सांगून मोकळे झाले. पोलिसांची भूमिकाच यामुळे संदिग्ध होत आहे. त्यामुळे दुसऱ्या इमारतीतील कर्मचाऱ्यांनी या नागरिकाला शिवीगाळ केली व धमक्या देत होते. वाहतूक पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेऊन शांत बसून होते. त्यांनी संबंधित वाहनावर कारवाई केली कि नाही हे सुद्धा “गुलदस्त्यात” आहे.
नागपूर हे आता वेगाने वाढणारे शहर असून जर आय टी पार्क सारख्या मोक्याच्या ठिकाणी पार्किंगसाठी असे वाद होणार असेल तर खरंच नागपूरला “स्मार्ट शहर” म्हणण्याचा अधिकार आहे काय? असा सवाल नागरिक विचारत आहे?