काँग्रेसच्या उमेदवारीची माळ आमदार सुभाष धोटे यांच्या गळ्यात?

विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या कलहामध्ये अजूनपर्यंत चंद्रपुर लोकसभा मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीची माळ तिसऱ्याच उमेदवाराच्या गळ्यात पडणार असे दिसते. राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांचे नाव काँग्रेस हायकमांड कडून जवळपास निश्चित झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून द पीपल ला कळविण्यात आले आहे.
मागील २ महिन्यापासून सुरु असलेली हि रस्साकशी वेगळ्याच वळणावर आलेली दिसते. विजय वडेट्टीवार यांनी आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्याकरिता दिल्लीत जोरदार फिल्डिंग लावली होती. परंतु त्याला तेवढेच तोड उत्तर देऊन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा आपण कुठे कमी नाही याची प्रचिती चंद्रपूर लोकसभा मतदार संघामध्ये आणून दिली. मागच्या वेळेला तत्कालीन गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पाडण्यासाठी कामी आलेला “कुणबी फॅक्टर” आपल्या मदतीला येईल याची खात्री आमदार धानोरकर याना असल्यामुळे त्या मागे हटायला तयार नाही.
पण या सर्व घडामोडीत पक्षश्रेष्ठीनी कुणाचीच बाजू न घेता तिसऱ्याच्याच म्हणजे सुभाष धोटे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार हे जवळपास निश्चित झाले आहे असे कळते. या सर्व प्रकरणात आता पुढे काँग्रेसच्या गटातटात कोण कोणाला “मदत” करेल हे महत्वाचे ठरेल.