खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि तोडक कारवाई करु नये म्हणून पत्र दिलं.
Dharavi Masjid : मुंबईतल्या धारावीत तणाव निर्माण झाला आहे. मशिदीची बेकायदेशीर भाग तोडण्यावरुन वाद सुरु झाला. हा भाग तोडण्यासाठी जी महापालिकेची गाडी गेली त्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. तसंच या भागात जमाव एकवटला आहे. या सगळ्यानंतर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि सदर कारवाई होऊ नये म्हणून पत्र दिलं.

नेमकं काय घडलंं?
वर्षा गायकवाड यांच्या पत्रातील माहितीनुसार धारावीच्या परिसरात एक मशिद आहे. या मिशिदीचा काही भाग बेकायदेशीर असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे आज मुंबई महानगरपालिकेचं पथक हा बेकायदेशीर भाग तोडण्यासाठी धारावीत दाखल झाले होतं. मुंबई महापालिकेचं पथक आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्यांना अडवले. तसेच बीएमसीच्या गाडीच्या काचाही फोडल्या. तसेच काही नागरिक रस्त्यावर बसले असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना ही कारवाई होऊ नये म्हणून पत्र दिलं.