शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात घोषणा.

नागपूर: अतिवृष्टीमुळे यावर्षी अधिकांश प्रमाणात शेतकऱ्याच हातातोंडाशी आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रतिवर्षी मोठ्या कसोशीने उघड्या आभाळाखाली बळीराजा आपल्या कष्टाची पेरणी करत असतो मात्र कधी निसर्गाचं प्रकोप तर कधी कष्टाने पिकविलेल्या पिकाला न मिळालेलं योग्य भाव यामुळे शेतकरी कर्जबाजारी होउन आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत असतो.म्हणून राज्यातील शेतकऱ्याची आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्याचा, व धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.

सोबतच महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात आल्याचे जाहिर करत ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये ४४ लाख शेतकऱ्यांना १८ हजार ७६२ कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आल्याची माहिती दिली.मात्र सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने ६ लाख ५६ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहीले. आता अजुन ६.५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात केली.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात घोषणा.