२०० युनिट मोफत विज ही केवळ मागणी नाही तर तो आमचा अधिकार आहे – आमदार जोरगेवार

नागपूर: चंद्रपूर जिल्हाला २०० युनिट विज मोफत देण्यात यावी ही केवळ मागणी नाही तर तो आमचा अधिकार आहे. यासाठी सुरु असलेला आमचा संघर्ष प्रत्येक पातळीवर सुरू राहील. आज हिवाळी अधिवेशनात पुन्हा आपण हा मुद्दा उपस्थित करत या रास्त आणि हक्काच्या मागणीकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
राज्याला वीज पूरविण्यासाठी जगात सर्वात प्रदूषित असलेली थर्मल एनर्जी आम्ही तयार करतो. याचा परिणामही आम्हाला सोसावा लागत आहे. देशातील सर्वात प्रदूषित जिल्हात आमचे नाव आहे. मात्र आम्हाला याचा मोबदला मिळत नसेल तर हा अन्याय आहे. राज्याला वीज देऊन आम्ही काय पाप करतोय काय?आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बोलताना चंद्रपूर जिल्हासह वीज उत्पादक जिल्हांना वीज सवलत देण्यात यावी अशी मागणी केली आहे. हातमाग उद्योगांमध्ये काम करणा-या कामगारांसाठी सरकारने २०० युनिट विज मोफत करण्याचा निर्णय केला आहे. हा निर्णय कौतुकास्पद आहे. आता याच धर्तीवर वीज उत्पादन करुन प्रदुषण सहन करत असलेल्या वीज उत्पादक जिल्हांना घरगुती वापराची दोनशे युनिट विज मोफत देण्यात यावी व उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देण्यात यावी अशी मागणी केली.