नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात 54 बुलेट गाड्या जप्त

काल 15 ऑगस्ट रोजी नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात फटाके फोडणारे सायलंसर असणाऱ्या 54 बुलेट गाड्या जप्त केल्या आहेत तर ईतर वाहनावर हीं सदर पोलिसांनी मोठी कारवाई करत काल दिवसभरात 3 हजाराहून अधिक वाहनावर विविध कलमान्वये कारवाई केली आहे.

मोडिफाय सायलंसर असणाऱ्या वाहन चालकांना ओरिजनल सायलंसर बसविल्यावरच वाहन परत दिल्या जात आहेत..
मोठ्या आवाजाची कर्कश हॉर्न काढून नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर वाहतूक पोलीस विभागाच्या डीसीपी चेतना तिडके यांनी दिली आहे.