नागपुर: – पशुवैद्यकीय खाजगी कॉलेजला मान्यतेच्या विरोधात पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा पाचवा दिवस असून आज संतप्त होत त्यांनी चक्क विद्यापीठाच्या मुख्य दाराला कुलूप ठोकले… मागील पाच दिवसापासून महाराष्ट्रातील सहा पशु विज्ञान विद्यापीठांतर्गत असलेल्या शासकीय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याने,आज संतप्त होत विद्यार्थ्यांनी नागपुरातील पशुविज्ञान विद्यापीठाच्या मुख्य द्वाराला कुलूप ठोकत संताप व्यक्त केलाय….
महाराष्ट्र सरकारने पशुविज्ञान विद्यापीठांतर्गत खाजगी कॉलेजेसला अधिवेशनात मंजुरी दिल्यापासून शासकीय कॉलेजच्या पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे… आज चार दिवस लोटून सरकार याकडे लक्ष देत नसल्यानं पाचव्या दिवशी आक्रमक पावित्रा घेतलाय.