नागपूर शहरात सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसत असून, आकाशात मेघगर्जना होऊन पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे.
ताज्या अपडेट्ससाठी D People News सोबत राहा!