ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाने जागतिक पर्यटन नकाशावर नाव कोरले आहे आणि त्याच व्याघ्रप्रकल्पातील वाघांनी जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. आतापर्यंत या व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील वाघांनी पर्यटकांना आकर्षित केले होते. आता बफरक्षेत्रातसुद्धा पर्यटकांची तेवढीच गर्दी वाढू लागली आहे. या व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या प्रत्येक करामती वन्यजीव छायाचित्रकारांमुळे पर्यटकांसमोर येत असतानाच आता या बफर क्षेत्राचा राजा असणाऱ्या ‘छोटा मटका’ने मात्र पर्यटकांना चिंतेत टाकले आहे.
निसर्गाचा थक्क करणारा अनुभव! #ताडोबा मध्ये शनिवारी सकाळी, किंग छोटा मटकाचे ‘डेडली बॉईज’ म्हणून ओळखले जाणारे दोन वाघ मंदिराच्या प्रांगणात हनुमानजीच्या मूर्तीभोवती प्रदक्षिणा करत असताना पर्यटकांना थक्क करून टाकले. निमडेला गेटच्या प्राचीन रामदेगी मंदिरात जंगलाच्या हृदयात वन्यजीवांची भक्ती पाहण्याची संधी लाभली. तडोबा महोत्सवाच्या दरम्यान, दक्षिण कोरियामधील एनआरआय पर्यटक सौरभ शिर्पूरकर वाघांचे दर्शन घेऊन भारावून गेले. #TadobaFestival2024 हा वन्यजीव संरक्षण, टिकाऊ पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे.