- विदर्भात औद्योगिक महोत्सवाचे आयोजन
- ताडोबा-अंधारी अभयारण्यामुळे व्यवसाय वाढला
- वर्धा येथे होत असलेल्या सिंदी ड्राय पोर्टचे महत्व अधोरेखित केले
नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात येत्या 27 ते 29 जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. या महोत्सवात विदर्भातील विविध उद्योगांच्या प्रदर्शनासोबतच, बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले, “ताडोबा-अंधारी अभयारण्याचा उदाहरण देत गडकरी म्हणाले, “औद्योगिक विकासामुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळते. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडस्ट्रीज वाढल्या त्यामुळे तेथे बाहेरचे लोक आले आणि इतर स्थानिक व्यवसायांनादेखील चालना मिळाली. आता विदर्भातही आपण नेमकं हेच करणार आहोत. येथे महिंद्रा, मदर डेअरी सारखे उद्योग येत आहेत. नवनवीन इंडस्ट्रीज येतील तर विदर्भातील स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल. या इंडस्ट्रीज मध्ये आलेल्या नवीन लोकांमुळे व्यवसाय वाढतील. हेच उद्योग मग तुम्हालाही जाहिराती देतील.”

गडकरी म्हणाले, “असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड) तर्फे आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सव 27 जानेवारी ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसर, अमरावती रोड, नागपूर येथे होणार आहे. खासदार औद्योगिक महोत्सवाच्या अंतर्गत नागपुरात प्रथमच हे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील सर्वात मोठा इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह या माध्यमातून बघायला मिळणार आहे.”
यावेळी गडकरी यांनी विदर्भातील कापूस आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरिता वर्धा येथे होत असलेल्या सिंदी ड्राय पोर्टचे महत्व अधोरेखित केले. कापसाच्या गाठीची थेट बांग्लादेशला हल्दीया बंदराच्या माध्यमातून वाहतूक झाल्यास विदर्भातील कापूस उत्पादकांचा वाहतूक खर्च वाचेल आणि त्यांना प्रतिक्विटंल आर्थिक लाभ होईल.
गडकरी म्हणाले, “कुही येथे अडीच हजार एकर जमीन ही एमआयडीसीची असून या जमिनीवर जर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी उपलब्ध केले, तर येथे पेट्रोल रिफायनरीचीही क्षमता निर्माण होईल. भद्रावतीच्या जंगलात आहेत मिथेनचे साठे. त्याचासुद्धा उपयोग औद्योगिक वाढीसाठी होईल.”