अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यास नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे 7000 किलोचा हलवा तयार करणार आहेत. श्रीराम प्रभूंना या हलव्याचा भोग दिल्यानंतर दीड लाख राम भक्तांना प्रसाद स्वरूपात या हलव्याचे वितरण केले जाणार आहे. हा प्रसाद एकाचं वेळी तयार करण्यात येणार असून त्यासाठी देशातील सर्वात मोठ्या आकाराची कढई तयार करण्यात आली आहे. या कढईची गोलाई 15 फूट, उंची 4 फूट, आणि वजन 1800 किलो अशी महाशय कढई तयार करण्यात आली आहे. या कढईला उतरवण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती विष्णू मनोहर यांनी दिली आहे.